The Rules & Red Flags (Marathi)

449.00

Description

दि रूल्स अँड रेड फ्लॅग्स्
आर्थिक व्यवस्थापनाची यशोगाथा
पुस्तकाविषयी
हे पुस्तक आर्थिक व्यवस्थापन आणि आर्थिक गैरव्यवस्थेच्या वास्तविक जीवनातील कथांवर आधारित आहे. या कथा स्वयं मार्गदर्शित आहेत आणि चांगल्या आर्थिक व्यवस्थापनाबद्दल आपल्याला शिक्षित करतील. एकाच व्यावसायिकाच्या वास्तविक जीवनातील तीन कथा आहेत. या पुस्तकात नमूद केलेले आर्थिक व्यवस्थापनाचे नियम आणि रेड फ्लॅग्स् हे आपल्याला आपल्या व्यवसायासाठी लागणारे आर्थिक निर्णय घेण्यास मदत करतात.
जरी आपण आर्थिक पार्श्वभूमी नसलेले असाल तरीही आपल्याला आर्थिक नियम आणि रेड फ्लॅग्स् ह्या संकल्पना समजतील. ह्या संकल्पना आपल्याला आपला व्यवसाय प्रस्थापित करण्यासाठी आणि प्रभावीपणे आर्थिक निर्णय घेण्यास मदत करतील. सर्व क्लिष्ट संकल्पना सोप्या आणि सामान्य माणसाच्या भाषेत स्पष्ट केलेल्या आहेत. व्यवसायात गुंतविलेल्या आपल्या भांडवलाच्या अपेक्षित परताव्याची गणना कशी करावी, हे या पुस्तकात नमूद केलेले आहे. हे पुस्तक आर्थिक निर्णयासाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या आर्थिक साधनांचा वापर कसा करावा याबद्दल मार्गदर्शन करते. याव्यतिरिक्त, आर्थिक गैरव्यवस्थापन (Financial mismanagement) हे आर्थिक फसवणुकीचा कसा पाठलाग करते, या विषयावर देखील या पुस्तकात विवेचन करण्यात आलेले आहे. आपणास शेअर मार्केट, कमोडिटी मार्केट किंवा फॉरेक्स मार्केटमधील बहुतेक ट्रेडर पैसे कमविण्यात अयशस्वी होण्याचे मूलभूत कारण देखील याच पुस्तकात मिळेल. “पैशाची निर्मिती” ही अद्भुत संकल्पना प्रथमच या पुस्तकात समाविष्ट केली गेली आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!