Smaran Ruperi (स्मरण रुपेरी )

350.00

Description

प्रिय मित्र भय्या बोमचे ह्याला चारू कुलकर्णीने लिहिते केले हीच एक फार मोठी गोष्ट आहे. भय्याचे अनुभव विश्व फार फार वेगळे आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

थिएटरमध्ये सिनेमा प्रोजेक्टर चालवता चालवता भय्या मायको कंपनी मध्ये एक चांगला मशीन ऑपरेटर झाला पण त्याचे मन नेहेमीच थिएटरमध्ये राहिले आहे. त्याने चालवलेले सिनेमे, त्यातली कर्णमधुर गाणी, त्यातले अभिनेते, नट्या व त्यांच्या सिनेमाबाहेरील विश्वातल्या आठवणी भय्या अगदी रंगवून सांगत असे व आजही सांगतो. त्या ऐकतांना ह्याला इतक्या गोष्टी इतक्या बारकाव्यांसहित कशा आठवतात असा विचार करतांना त्याचे मन कुठे गुंतले आहे हे दिसते.

सिनेमाचे, थिएटरचे विश्व उलगडताना भय्या नकळतपणे आपल्याला त्याच्या बालपणात घेऊन जातो, बालपणातले प्रसंग तो आपल्या कुटुंबाच्या आर्थिक कुचंबणेकडे अजिबात लक्ष न देता निरागसपणे आपल्यापुढे मांडतो पण त्याचवेळी गदिमांच्या ओळी उधृत करून वास्तवाची आता झालेली जाणही तो तितक्याच सहजपणे मांडतो. जी गोष्ट बालपणाची तीच तरुणपणातील मायकोच्या दिवसांबद्दल, शूटींग बघण्याच्या वेडाबद्दल, स्वतःच्या निवृत्तीबद्दल म्हणता येईल. मुळात माणूस सिनेमावाला असल्याने त्याच्या कथनात एखाद्या सिनेमाची ओघवता, मोकळेपण आहे व त्याची स्वतःची निरागसता आहे.
त्याच्या लिखाणात विषयांचे वैविध्य आहे. प्रोजेक्टर दुरुस्तीचे ज्ञान आहे, चित्रपट निर्मितीतील बारकावे आहेत, सामान्यातून यशस्वी नट, संगीतकार होणाऱ्या माणसांची कहाणीही आहे, चित्रपट गीताची निर्मिती कथा आहे तर सिनेमाचा विषय कुणाला कसा सुचतो हयाबद्दलही माहिती आहे.

भय्याचे लिखाण वाचतांना, संपादित करतांना सतत जाणवली ती त्याची उत्स्फूर्तता, वेगळी कथन शैली आणि सध्याच्या वास्तवाची असलेली जाणीव.

हे पुस्तक, त्याचा वेगळा विषय, आशय सर्व वाचकांना निश्चित आवडेल अशी खात्री आहे.

यशवंत जोशी

८८०५० ००९२२

Additional information

Weight0.180 kg
Dimensions21 × 14 × 0.6 cm