Rutuchkranusar Naisargik Aahar (ऋतुचक्रानुसार नैसर्गिक आहार )
₹153.00
आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण प्रत्येकजण घड्याळाच्या काट्याबरोबर स्पर्धा करीत जीवन जगत असतो. परंतु असे करताना आपले आणि शरीराचे अतोनात नुकसान करून घेत असतो आणि त्यापासून आपण अनभिज्ञ असतो. अशा जीवनशैलीमुळे आपल्या जैविक घड्याळाचा समतोल आपण विस्कळीत करून अनेक व्याधींना जन्म देत असतो. शरीराचे जैविक घडयाळ समतोल ठेवण्यामध्ये आपल्या जीवनशैलीतील महत्त्वाचे अंग म्हणजे आपला आहार.. हा आहार जास्तीत जास्त नैसर्गिक ठेवला असता आपण फक्त आजारांपासून लांब राहत नाही तर दीर्घकाळ सुदृढ असे आयुष्य सुद्धा जगू शकतो. ह्या साठी हे पुस्तक खरोखरीच मार्गदर्शक आहे.
Description
प्रत्येकाने आहार जाणीवपूर्वक घेतला पाहिजे. अन्न घेताना त्यातील गुणधर्मांची जाणीव आपल्याला असेल, तर आपण आपल्या आहाराचे योग्य नियोजन करू शकतो. फळ असो नाहीतर भाजी असो, त्याचे आयुर्वेदशास्त्रानुसार गुणधर्म, तसेच आहारशास्त्रानुसार त्यातून मिळणाऱ्या प्रोटीन्स, मायक्रो न्यूट्रियन्ट यांचे देखील थोडक्यात वर्णन केले आहे. जुन्या-नव्याचा संगम करून आहार घेणे ही काळाची गरज आहे. या पद्धतीने जाणीवपूर्वक नियोजन केल्यास, गृहिणी कितीही व्यग्र असली, तरी आपल्या कुटुंबाला आहारातून उत्तम आरोग्य देऊ शकते.
आयुर्वेदशास्त्रात ऋतूनुसार आहाराला अत्यंत महत्त्व आहे. निसर्गाने देखील त्याप्रमाणे नियोजन केले आहे. त्या-त्या ऋतूत मिळणारे नैसर्गिक आहार घटक, हे त्या-त्या ऋतूत आरोग्यासाठी महत्त्वाचे आहेत. हे सुलभतेने लक्षात यावे म्हणून पुस्तकातल्या लेखांचे ऋतूंनुसार वर्गीकरण केले आहे. प्रत्येक ऋतूच्या सुरुवातीला त्या ऋतूचा शरीरावर होणारा परिणाम याचे वर्णन करून, ते टाळण्यासाठी काय खावे व काय टाळावे हे लिहिले आहे. पण केवळ घटकांची यादी न देता, त्या ऋतूत निसर्गतः उपलब्ध असणाऱ्या व आपल्या नित्य आहारात वापरल्या जाणाऱ्या अनेक घटकांचे विस्तृत वर्णन केले आहे.
Additional information
Weight | 0.238 kg |
---|---|
Dimensions | 22 × 14 × .7 cm |