O. P. Nayyar aani Mi ओपी नय्यर आणि मी

300.00

ओ. पी., आशाजी व रफीसाहेब या त्रिकुटानं आम्हाला भरभरून दिलं त्यात काय नव्हतं ? सगळं काही होतं ! … निस्सीम प्रेमाच्या उत्कट आणाभाका होत्या. खट्याळपणे केलेली छेडखानी होती, रंजीश होती, फर्माईशही होती. तनहाई होती, गहराई होती. जुदाईही होती. इन्कार होता. इकरारही होता. वेदना होती तशीच संवेदनाही होती. दर्द का बयान था, हमदर्दीकी जबान थी । मनापासून घातलेली साद होती. मुकी दाद होती. याद होतीच होती, फरियादही होती.

Description

 

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

दुसर्‍या आवृत्तीच्या निमित्ताने

प्रिय बाबुजी,
आपल्या जमून आलेल्या मैफिलीतून आपण एकाएकी निघून गेलात. कायमचे. तो अशुभ दिवस होता 28 जानेवारी 2007. ध्यानीमनी नसताना आपली बैठक विस्कटली. 13 वर्षे उलटून गेली त्या घटनेला. किती वेळा एकत्र आलो. रमलो. आपल्या सहवासात व्यतीत केलेला तो अल्प काळ माझ्या आयुष्यातला सुवर्णकाळ होता. कधीही त्याचे विस्मरण झाले नाही; होणे नाही बाबुजी आपल्या सायंकालीन गाठीभेटींची, गप्पाष्टकांची मी डायरीत नित्यनेमाने नोंद घेत होतो. त्यातून साकारलेल्या या चरित्रात्मक ग्रंथाची पहिली आवृत्ती काही महिन्यात हातोहात खपली. दुसर्‍या आवृत्तीची प्रदीर्घ प्रतीक्षा आज व्यासंगी अर्थतज्ज्ञ आणि गुंतवणूक सल्लागार श्री रघुवीर अधिकारी आणि श्री बिपिन बाकळे यांच्या सौजन्यशील सहकार्यामुळे पूर्ण होत आहे.
रसिक वाचकांच्या उत्स्फूर्त स्वागताचा मान या साहित्यकृतीला मिळाला. खूप माऊथ पब्लिसिटी वाट्याला आली. या स्वागतापाठोपाठ एक गुणविशेष या ग्रंथाला अलगद चिकटला. लंपास किंवा अदृश्य होण्याचा ‘गहाळयोग’ या पुस्तकाच्या भाळी लिहिलेला होता. “वाचून नक्की परत करीन” या बोलीवर लोक पुस्तक नेतात आणि परत आणून देत नाहीत. सरळ ‘हारवलं’ म्हणून सांगतात’ अशी तक्रार सांगणारे अनेकजण मला भेटले. त्यात माझ्या साख्खा थोरला भाऊही आहे. एका सार्वजनिक वाचनालयातला किस्सा तर भन्नाट आहे. तिथे या पुस्तकासाठी तीन महीने क्लेम लावले तरी मंडळींना पुस्तक मिळत नसल्याने चिरडीवर आली. मग वाचनालयाने पुस्तकाच्या आणखी दोन प्रति मागविल्या. एका पुस्तकासाठी तीन काऊंटरवर क्लेम लावण्याची व्यवस्था केली गेली. तरीही परिस्थितीत फरक पडला नाही. शेवटी ज्यांच्या नावावर तिन्ही प्रति नेल्याच्या नोंदी होत्या त्यांना बोलावण्यात आलं. ते आले आणि त्यांनी पुस्तक गहाळ झाल्याचं मान्य करून सरळ माफी मागितली. पुस्तकाच्या किंमतीसह दंड भरला. पण वाचनालयातून पुस्तके गेली ती गेलीच. ती परत येणार नव्हतीच. वाचनालयाने पुन्हा पुस्तके आणण्यासाठी पुन्हा नव्याने खटपट केली पण तोवर पुस्तकांची आवृत्ती संपली होती. असो व्यक्तीश: मलाही काही वेळा प्रतीसाठी प्रेमानं घेरलं गेलं आहे. पण जे बाजारातच उपलब्ध नाही ते मी कुठून देणार होतो ?
बाबुजी या पुस्तकाचं “सार”ं श्रेय आपलं आहे मी केवळ शब्दभारवाही. शब्दांच्या ओळीनं वीटा रचणारा एक गवंडी, ही माझी इथली भूमिका आहे. आपण या चरित्रात्मक ग्रंथाचे नायक आहात 50 वर्षे उलटल्या नंतरही आपल्या संगीताचा जनमानसावरील प्रभाव सदैव गडद राहिला आहे. अमरत्वाचा चिरंतन ठसा उमटल्याने आपले संगीत कधीही फिके पडणार नाही. आपल्यावरील प्रेमादराखातर आपल्या सांगितिक कार्यकर्तृत्वाचा अंत:करणपूर्वक मान ठेवून वाचक या पुस्तकाकडे आकर्षित झाले ही वस्तुस्थिती आहे.
अधिक काय लिहू बाबुजी ? आपण तर अज्ञाताकडे निघून गेलात. प्रत्यक्षातली साथ सुटली. आवर्जून बोलण्यासारखं आता मागे काही उरलं नाही. तुमच्या संगीताच्या आधारानं या पुढली वाट धरायची. त्यात आनंद मानायचा.
जिथे कुठे असाल तिथे कुशल असा हेच अंतिम मागणे.
सदैव आपला
भगत परलाद
(भक्त प्रल्हाद)

Additional information

Weight0.280 kg
Dimensions21.5 × 14 × 1.2 cm