Mantarang… Mokshache ! मन तरंग … मोक्षाचे !

100.00

 

मोक्ष ! अर्थात मुक्ती !! हे शब्द आध्यात्मिक माणसाच्या जिव्हाळ्याचे शब्द. 

आध्यात्माच्या मार्गावर चालणाऱ्या खऱ्या साधकाचे अंतिम ध्येय म्हणजे मुक्ती ! एक तर जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती अथवा जिवंतपणी सर्व वासनांपासून, द्वैतापासून मुक्ती असा साधा मोक्षाचा अर्थ ! ईप्सित ध्येय गाठल्याशिवाय थांबू नका असे कठोपनिषद सांगते. हे ध्येय कोणते? हे ध्येय, ईप्सित  मानवजातीसाठी मोक्षच होय. स्वामी विवेकानंद म्हणत “मानव हा मुक्तीसाठीच जन्मास येत असतो. ह्या जन्मात नाहीतर पुढच्या जन्मात तो मोक्षासाठी प्रयत्न करत राहतो. त्याला स्वर्गप्राप्ती पेक्षाही मोक्ष हवा असतो.” 

माझ्या सारख्या सामान्य साधकाला ह्या मोक्षाबद्दल, मुक्तीबद्दल कुतूहल निर्माण होते. म्हणून मोक्ष ह्या विषयी माहिती मिळवत, काही स्वतः अनुभव घेत खूप साऱ्या संकल्पनांचे संकलन झाले. तसा विषय काही नवा नाही! त्यामुळे लेखनात नावीन्य असेल असेही नाही. पण “मोक्ष” ह्या संकल्पनेची उजळणी होऊन साधकाची निर्विकल्प साधना होण्यास मदत व्हावी हीच छोटीशी अपेक्षा. 

सदर पुस्तिकेतून आपणास ध्यान धारणेसाठी काही उपयोग झाल्यास तिचे उद्दिष्टय सफल झाले असे म्हणत येईल.ही आपण संग्रही ठेऊ शकता अथवा कोणाला भेटही देऊ शकता.

ह्या पुस्तकाच्या विक्रीतून येणाऱ्या रकमेतून जनजाती  मुलांच्या शिक्षणाचा खर्च केला जाणार आहे. त्यामुळे आपण सर्वांनी हे पुस्तक विकत घेऊन ह्या उपक्रमास  हातभार लावावा.

 

प्रा. सी.ए.  हेरंब गोविलकर 

Description

जलाशयात काही हालचाल झाली, वारा आला, एखादी वस्तू त्यात पडली तर तरंग उमटतात. लेखकाच्या मनात ‘मोक्ष’ या बाबीने तरंग उठवले. लेखकाने लिहिल्याप्रमाणे, “माझ्यासारख्या सामान्य साधकाला ह्या मोक्षाबद्दल, मुक्तिबद्दल कुतूहल निर्माण होते. म्हणून मोक्ष या विषयी माहिती मिळवत काही स्वतः अनुभव घेत… संकलन केले.” हे लेखन का केले याचेही उत्तर लेखक आपल्या मनोगतात देतात –“मोक्ष या संकल्पनेची उजळणी होऊन साधकाची निर्विकल्प साधना होण्यास मदत व्हावी हीच छोटीशी अपेक्षा.” या दोन वाक्यात लेखनाची प्रक्रिया आणि लेखनाचा हेतू स्पष्ट झाला आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

मोक्षाच्या वाटेवरील तीन मोठे अडथळे म्हणजे वासना, अहंकार आणि राग यावरील तीन प्रकरणांनी पुस्तकाची सुरुवात केली आहे. त्यांचे विविध कंगोरे आणि त्यांच्यावर मात करण्याचे उपाय नमूद करून लेखकाने पुढे मोक्ष मार्गावरील चार आवश्यक बाबी – प्रेम, मौन, प्रार्थना आणि साधना यांचा ऊहापोह केला आहे. या चार गोष्टी ‘गुरुबिन’ कशा अपुर्‍या राहतात यावर जोर देऊन शक्तिपात प्रक्रियेचे विस्तारित वर्णन केले आहे. या प्रवासात ‘मन’ या सहाव्या इंद्रियाची चपखल ओळख करून दिली आहे. हे इंद्रिय अदृश्य असले, चंचल असले तरी प्रचंड शक्तिमान आहे. त्याला काबूत ठेऊन गुरुला शरण जाऊन, त्याने दिलेल्या मार्गाने निर्विकल्प साधना कशी करता येईल यावर एक सुंदर प्रकरण आहे. मोक्षाच्या वाटेवर भक्ति तर हवीच पण जोडीला कर्मसंन्यास आणि आत्मज्ञानही हवे याचे भान आणून देणारी दोन प्रकरणे आहेत. शेवटचे प्रकरण ‘ईश्वरदर्शना’चे आहे.  

डॉ. विनायक गोविलकर 

Additional information

Weight0.130 kg
Dimensions21 × 14 × 0.5 cm