Kala Sadhana Antrang कला साधना अंतरंग

200.00

‘आवड’ म्हणून सुरू केलेली कला, उच्च आणि दर्जेदार व्यासंगापर्यंत कशी न्यावी, साधनेची पाऊले अंतरंगाकडे कशी वळवावीत याचे पथदर्शन करणारे, कलासाधक व शास्त्रीय संगीत गायक श्री सचिन चंद्रात्रे यांचे हे पुस्तक. प्रदर्शनाआधीचे ‘दर्शन’ मनात बिंबविणारे एक मुक्त कलालेखन, जे कला क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी नावाजले आणि वाखाणले !

स्पर्धा, परीक्षा, प्रसिद्धी आणि तंत्र यात अडकून पडलेले आजकालचे कलाशिक्षण, पुन्हा एकदा शुध्द साधनेच्या वातावरणाकडे वळविणारे, साधना विचारांचे आग्रही प्रतिपादन करणारे हे वेचक आणि वेधक ‘कलाविचार प्रकटन’ !!

कलाक्षेत्रातील प्रत्येक साधकाने आणि कलाकाराने वाचलेच पाहिजे असे परखड विचारांचे झणझणीत अंजन म्हणजे “कला साधना आणि अंतरंग” ! हे पुस्तक. अवश्य वाचा, भेट द्या व संग्रही ठेवा.

Description

पूर्वीच्या काळी राजाश्रय असल्यामुळे संगीत साधकाला दोन वेळच्या अन्नाची भ्रांत नव्हती मात्र सध्याची सामाजिक परिस्थिती निराळी आहे. अनेक अडचणींवर  मात करून  जो साधना करतो आहे, त्याचे कौतुकच आहे. ‘बीजसाधना’ या लेखातून “आविष्कार म्हणजे आतली उर्जा बाहेर जाणे आणि साधना म्हणजे आतल्या उर्जेचे उत्खनन”, हे सत्य समोर येते. त्यापुढे ‘साधकदृष्टी’, आणि ‘गुरुशिष्य जातीपरीक्षा’ या लेखांमधून शिष्याने गुरु कसा पारखून घ्यावा याचे फार मार्मिक वर्णन झाले आहे. यावरुन आठवले की माझे बाबा मुंबईत आले तेव्हा गुरु शोधण्यात त्यांनी तब्बल एक वर्ष घालवले. त्यांची मनोधारणा अशी होती की जो गुरु मला टोकेल, आणि वेळ आली तर श्रीमुखात भडकावेल असा गुरु मला पाहिजे. त्यांना पं.पराडकरबुवांसारखे महान गुरु मिळाले पण त्यांनीही बाबांची महिनाभर परीक्षा घेतली आणि नंतरच त्यांना वेगळे शिकवायला घेतले. असो. “शुद्ध बीजापोटी”, “कासव”, “एकांत साधना”, असे सोपे लेख साधना दालनातील प्रकाश उजळून टाकणारे झाले आहेत. प्रत्येक क्षेत्रातील कला साधकांनी हे वाचून त्याची अंमलबजावणी केल्यास त्याचा उपयोग होईल कारण साधकाने स्वतःला कसे घडवावे ह्याची उत्तरे ह्यात आहेत. ”जो साधक स्वतःच्या मौनात मस्त असतो गर्दी त्याला आपोआप सोडून जाते” हा अतिशय मोठा विचार आहे. आजच्या काळात या मार्गावरून जाताना ही सत्वपरीक्षा देता यावी यासाठी हे पुस्तक जिद्द निर्माण करणारे आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

कलादालनातील सगळीच प्रकरणे अतिशय सखोल विचारांची आहेत. कलाकाराचा ध्यास हा गहन विषय पण कथारूपाने तो सोपा झाला आहे

“अखंडत्व” ह्या लेखात लेखकाने याविषयी स्वतःचाच अनुभव निर्भीडपणे दिला आहे. “सुरांशी नाते” चांगले रंगले आहे, तर “मूर्तीलावण्य” या लेखात भारतरत्न लता मंगेशकरांच्या उदाहरणाने शोभा आली आहे.  “बदल” हा खोल अर्थांचा लेख समजणे व उमजणे हे आजच्या आजूबाजूच्या गढूळ वातावरणात खूप आव्हानात्मक आहे पण आशावादी राहणे उत्तम.. “सूक्ष्म दृष्टी गवसली की जडत्व हरवून चैतन्याचा प्रवास सुरु होतो, कला हीच जगामध्ये निर्गुण अनंताला व्यक्त सगुण करणारी भाषा आहे, न मागे तयाची होई कला होय दासी, याचना माणसाला छोटे बनवते तर औदार्य कलाकाराला मोठे बनवते.” अशी चपखल वाक्ये मनाला भावतात. “अंतरंग हे ‘ज्ञान’, साधना ही ‘भक्ती’ आणि कला हे ‘कर्म’ हे जाणून ज्याला कला साधानेचा हा अद्भुत मार्ग गवसला त्याला अंतरंग सापडले” असा या पुस्तकाचा शेवट फारच गोड झाला आहे.

 पंडित सुहास व्यास 

Additional information

Weight0.160 kg
Dimensions21 × 14 × .5 cm