Horn Please – हॉर्न प्लीज

300.00

आपण आपल्या अवती भोवती असणाऱ्या माणसांमध्ये, निसर्गामध्ये, गर्दीमध्ये वावरत असताना मनाचे, जाणीवांचे चक्षू उघडे असतील तर नकळतच अनेक सुसंगती-विसंगती टिपल्या जातात. त्यातही प्रौढ शरीरातलं बालमन जीवंत असेल आणि त्याला निरीक्षणाचा नाद असेल तर हात आपोआपच लिहिते होतात.

बयाचदा आपण गर्दीत असूनही कोणात मिसळावं असं आजूबाजूला काही नसतं. अशा वेळी हे खोडकर मन त्याचं त्याचं काहीतरी टिपत रहातं. घरी आलं की ह्याने टिपलेले क्षण आपोआपच काहीतरी वेगळं रूप घेऊन अवतरतात, आणि कागदावर उतरतं !

नेहमीच्याच रहाटगाडग्यासारख्या जगण्यात, निरस कंटाळवाण्या क्षणांकडे बघताना, त्यातील विसंगती टिपत गेलं की निखळ विनोद फुलतो.

बऱ्याच व्यक्ती, घटना, दृष्ये आपण अवती-भोवती पहात असतो. पण ह्यातल्या काही व्यक्ती, काही घटना आपल्याला विचार करायला भाग पाडतात. काही अस्वस्थ करतात तर काही आनंदविभोर करतात. अशाच काही घटना, व्यक्तीविशेषांचा हा हसरा वेध !

Description

नीलिमा क्षत्रिय यांनी आपल्या बालपणीच्या आठवणींचं ‘दिवस आलापल्लीचे’ हे पुस्तक लिहिलं आणि मराठी साहित्यक्षेत्रात या एका पुस्तकामुळे त्यांनी जाणकारांचं लक्ष वेधून घेतलं. त्यांनी कुठलीही ‘पोज’ न घेता आपल्या सरळ, साध्या, प्रसन्न शैलीनं बालपणीचं विश्व साकार केलं. पुढे ही प्रसन्न शैलीच त्यांची ओळख ठरली. ती आपल्याला त्यांच्या ‘दिवस अमेरिकेचे’ ह्या प्रवासवर्णनात आणि पुढच्या साऱ्याच लेखनात वारंवार भेटते. किंबहूना त्यांच्या शैलीचे अनेक जण चाहते झालेले आहेत, याची साक्ष आपल्याला त्यांच्या पोस्टस् ना ‘फेसबुका’ वर मिळणारी भरघोस दाद पाहता-वाचताना जाणवतं. ‘हॉर्न प्लीज‘ हा असाच त्यांच्या विनोदी लेखांचा संग्रह आहे. एका साध्या पण आधुनिक काळातल्या बाईचं नवरा, मुली, नातवंड, नातेवाईक, पाळीव प्राणी, समतरुण (सम‘वयस्क’ शब्द बायकांबाबत वापरायला नको) मैत्रिणी असं हे घरगुती विश्व आहे. त्यात येणारे प्रसंग (कार चालवायला शिकणं, लग्नात जाऊन (दुसऱ्यांची) लग्न जमवणं, महिला मंडळाच्या सहलीचे तीन तेरा वाजणं) हेही असेच नेहमीचे आहेत. पण नीलिमा क्षत्रिय यांच्या नजरेतून हे सारे प्रसंग विलक्षण गमतीशीर होऊन अवतरतात. ‘स्त्रियांना विनोदबुद्धी नसते’ हा सार्वत्रिक गैरसमज त्या या पुस्तकाद्वारे ‘सर्फ एक्सेल’ने धुवून टाकतात.
– मुकुंद टाकसाळे
जेष्ठ विनोदी लेखक

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

Additional information

Weight0.230 kg
Dimensions22 × 14 × 1 cm

You may also like…