Dok Shabut Aahe – डोकं शाबूत आहे
₹410.00
संवाद
ही सबंध कादंबरी म्हणजे खरं तर स्वतःचा स्वतःच्याच मनाशी चाललेला संवाद होता. तीस पस्तीस वर्षं मुलांबरोबर महाविद्यालयात वावरत होते. वाढत होते. नोकरी हे निमित्त होतं. पण तिनं बाहेरच्या जगाचे दरवाजे उघडून दिले. त्यामुळे बदलत्या काळाचे हुंकार सतत ऐकू येत होते. तंत्रज्ञान झिरपत झिरपत शाळेत जाऊन पोचलं. दूरदर्शन, आंतरजालाने सगळं जग जवळ आलं आणि मुलांचं भवतालच बदलून गेलं. जनरेशन गॅपची ऐशी की तैशी! मुलांच्या तोंडची भाषा बदलली. बालपणाबद्दलच्या असलेल्या कोवळ्या, निरागस, भाबड्या अशा ज्या कल्पना, समजूती, त्या मोडीत निघायला लागल्या. चूल- बोळक्यांच्या जागी त्यांच्या हाती मोबाईल आणि माऊस आले. अनेक शब्द मुलं आज इतक्या अस्खलितपणे वापरतात की अवाक् व्हावं ! आजची तल्लख मुलं आपली मतं, शंका, विचार, भीडभाड न धरता धाडकन व्यक्त करतात. समोरच्याला अनेकदा निरुत्तर करतात. या मुलांच्यापुढे बालगीतांच्याही बऱ्याच आधी बातम्या आल्या. आजचं वास्तव त्यांच्यापुढे आ वासून उभं ठाकलं. तेही याचि देही याचि डोळा. माहितीच्या विस्फोटामुळे भावतरल, नाजुक, शब्दांच्या पलीकडले किंवा बिट्वीन द लाईन्स् … यापेक्षा, बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर अशा विज्ञानाच्या परिसावर प्रत्येक गोष्ट मुलं घासून घेऊ लागली. लीलया तंत्रज्ञान हाताळू लागली. परिणामी नव्या पिढीचं बोट धरून जुनी पिढी संगणक वापरू लागली. हँडब्रेक काढावा आणि न्यूट्रल गियरमध्येच गाडी सुसाट उताराला लागावी तसा फाळ बेलगाम चालला. आणि…..
मुलांवर आपण चांगले संस्कार करतो आहोत या भ्रमात जगणाऱ्या पिढीच्या याखालची वीट सरकायला लागली. चांगलं म्हणजे नेमकं काय ते त्यांनाही समजेनासं झालं. मती कुंठित झाली. आजचं बाल्य आणि कालची मूल्य यांच्यातल्या तारा जुळेनाशा झाल्या. विसंवादी सूर उमटायला लागले. पद्मा गोळे या कवयित्रीने आईपणाची भीती’ व्यक्त करताना म्हटलेही, ‘कोठे ज्ञान, यश, सुख/काय त्यांच्या खाणाखुणा/या-त्या रुपात दिसतो सैतानच वावरताना….’ ज्ञान, यश, सुख म्हणजे मकं काय याबाबत ताळमेळ जमेना. धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळतं अशा नाच्या चक्रव्यूहात जाणती अजाणती सगळीच सापडली. यंत्रयुगामुळे माणसाचं मोल कमी झालं की जास्त ?… असे प्रश्न घेऊन त्यावेळी चार्ली चॅपलीनचा ‘मॉडर्न टाईम्स’ सिनेमा आला. मर्ढेकरांच्या नवकवितेने ‘प्रेमाचे लव्हाळे, सौंदर्य नव्हाळ,…. असे प्रश्न विचारायला सुरुवात केली. तंत्रज्ञान विकसित झालं आणि आता त्या गोष्टीही मोडीत निघाल्या. परत एकदा काळाने कूस बदलली. तशी पुन्हा माणसांच्या व्यक्तिमत्त्वाची मुळ उघडी पडायला लागली. विज्ञानाच्या झंझावातात मूल्यांचा पुनर्विचार करायची वेळ आली. त्या काळाची ही कहाणी. म्हणजेच लहान मानू आणि पुढे मानसोपचारतज्ञ डॉ. मानव राजहंस यांची कहाणी. आपण सगळेच त्या काळाचे सक्षीदार. त्या काळाच्या सरोवरात आपल्या प्रत्येकाला आपलं प्रतिबिंब दिसेल. कादंबरीच्या रूपात या कहाणीन आकार घेतला. भूतकाळ आणि वर्तमानकाळातून कहाणी फिरत होती. काळाचा झिम्मा चालू होता. मराठीच्या अंगणी हा खेळ मांडताना आनंद आहे…’ मात्र गात हा मंत्र चला झपूर्झा गडे झपूर्झा!’
या झपूर्झा वाटचालीत अनेकांची साथ मिळाली. माझ्या स्वतःपेक्षाही माझ् कामावर ज्यांचा जास्त विश्वास आहे असे डॉ. नरेंद्र जोशी, नवऱ्यापेक्षाही त्यांनी सखा, सहचराची भूमिका कायमच स्वीकारली. मुलगा डॉ. हर्षवर्धन, सून डॉ. सौ. रूपा यांनी संसाराच्या जबाबदाऱ्यांतून, व्यापातापातून मुक्त केलं. मग दुसरी वेगळी खेळी सुरू झाली. नव्या पिढीचं बोट धरून मी संगणकाशी मैत्री करू शकले. संगणकाशी दोन हात करताना माझ्यासाठी प्रत्येक प्रश्नावरचं रामबाण उत्तर होतं ‘हर्षवर्धन !’ डॉ. सौ. इला आणि अमित… मुलगी, जावई यांच्याकडून डिस्टंट एज्युकेशन चालू होतं. पंच्याऐंशी पार असलेली माझी आई… मागे उभा मंगेश म्हणावा तशी मागे उभी. तिला सगळे मुंगी म्हणतात. सतत हलत असते. नसलेली कामही शोधून काढण्यात पटाईत. त्यातला थोडासा सुवर्णअंश माझ्यात आला असावा. असे सगळे सगे वाट्याला येणं ही परमेश्वरी कृपा.
संगणकावर श्रीगणेशा लिहायला श्री. शशिकांत पुजारींनी शिकवलं. सुरुवातीला त्यांनी कादंबरीचं बरंचसं टंकलेखनाचं कामही पार पाडलं. श्री. शिरीष देखणे म्हणजे पुढे उभा मंगेश. तसंही ते समोरच राहतात. बारकाईने वाचन करून त्यांनी कादंबरी लेखनातल्या मांडणीतल्या त्रुटी लक्षात आणून दिल्या. त्याही इतक्या संयमाने की हातात सुईसुद्धा न घेता काटा निघावा. श्री. नीतिन वैद्य, डॉ. बाहुबली दोशी, श्री.शरद साने, नव्या पिढीची प्रतिनिधी जागृती आयाचित, श्री. रजनिश जोशी, श्री. शशिकांत लावणीस, प्रा. मोहिनी पिटके, बडोदा विद्यापीठातील डॉ. सुषमा करोगल यांनी कादंबरी वाचून वेळोवेळी मोलाच्या खूप ‘सूचना दिल्या. साइकिअॅट्रिस्ट डॉ. प्रभाकर होळीकट्टी यांचं मोलाचं मार्गदर्शन मिळालं. कादंबरी भूतकाळात शिरताना प्रथमपुरुषी निवेदन आणि वर्तमानात येताना तृतीयपुरुषी निवेदन अशी तारेवरची कसरत चालली होती. तेव्हा तोल सांभाळताना, लिहिताना आपल्या नजरेतून सुटलेले लेखनातील आणि लेखनबाह्य धागे चिकित्सक नजरेने या सगळ्यांनी लक्षात आणून दिले. असं लेखन करत असताना एक त्रयस्थ दृष्टिकोन गरजेचा असतो. अनेक वर्षं मनात असणारा हा विषय दीर्घ कादंबरीच्या रूपाने साकारताना अभ्यासू, व्यासंगी, वाचनप्रेमी मित्रमंडळींबरोबरची वेळोवेळी केलेली चर्चा खूप मोलाची ठरली. या सगळ्या सोयऱ्यांची साथ मिळाली.
कादंबरी आकाराला आल्यावर, वाटचालीत नवीन सोयरे सामिल झाले. कोल्हापूर सकाळच्या ‘स्मार्ट सोबती’ पुरवणीच्या संपादिका सुरेखा पवार यांना कादंबरी आवडली आणि ती सकाळ पुरवणीतून क्रमशः प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला. पहिले दहा भाग सकाळ स्मार्ट सोबतीतून प्रसिद्ध झालेही…. पण अस्मानी सुलतानीला सामोरं जायला लागलं. कोविडमुळे वर्तमानपत्रांवरही निर्बंध आले. सदर संपल्यावर पुस्तकरूपाने कादंबरी वर्षभरानंतर प्रकाशित करायची असा विचार होता. पण तो विचार आधीच करावा लागला. सगळा वाचनव्यवहारच ठप्प झाला. त्यामुळे स्वतः प्रकाशन करण्याचा निर्णय घेतला. पुन्हा नवीन, वेगळाच व्याप आला. एक वेगळा अनुभव. प्रकाशनसंस्थेसाठी नाव, प्रतीकचिन्ह, आय.एस.बी.एन. नंबर आणि बरंच काही. त्यावेळी प्रकाशक संघाचे अध्यक्ष श्री. राजीव बर्वे, श्री. मधुर बर्वे यांच्यासारखे गुरू भेटले. श्री. रविमुकुल यांनी मुखपृष्ठ साकारताना कादंबरीतील आशयाला न्याय दिला. पझलच्या प्रतीकातून विचारांची संगती लावणारा, मनाचा शोध घेणारा चिंतनचेहरा त्यांनी मुखपृष्ठाला दिला. ‘सृजनगंध प्रकाशन’ यासाठी हास्यसम्राट श्री. दीपक देशपांडे यांनी सुंदर प्रतीकचिन्ह दिले. महाराष्ट्र मुद्रणालयाचे श्री. कोंगारी आणि त्यांचा मुलगा श्री. गौरव कोंगारी यांनी बारकाईने लक्ष घालून मुद्रणाची जबाबदरी पार पाडली.. …. लोग साथ आते गए और कारवाँ बनता गया’… या सगळ्यांचे मनापासून आभार.
आभाराच्या पुढेही काही शब्द असतात… बदन… नमस्कार. अनंत मनोहर यांना कादंबरीला प्रस्तावना लिहितील का म्हणून टंकलिखित प्रत त्यांच्याकडे पाठवली. कादंबरी वाचून झाल्यावर सौ. आशाताई मनो आणि श्री. अनंत मनोहर यांनी फोन करून कादंबरी खूप आवडल्याच सांगितलं कादंबरीतील वेगळ्या अशा आशयावर चर्चा केली. आपण जे काम करतोय ने वाचकांना आवडतंय असा विश्वास त्यामुळे मिळाला. ‘अजूनही मी वाचतो, लिहितो. तेव्हा तुम्हीही रोज दोन तास लेखन केलं पाहिजे’ असं नव्वदीत सांगण म्हणजे आशीर्वाद नाही तर दुसर काय म्हणायच! कष्टाचा वसा देणाऱ्या माझ्या सासऱ्याची.. वडिलांची आठवण आली. दोन दिवसात प्रस्तावना लिहून पूर्ण करतो आणि पाठवतो असा त्यांचा फोन झाला. पण….. पण मनात असूनही त्याना ते शक्य होऊ शकले नाही. अनिवार्य असं काही पायात वेटोळ घालून बसतंच. शेवटी फोनवरील काही शब्द त्यांच्या अनुमतीने आशीर्वादासारखे पाठीशी मलपृष्ठावर घेतले. ज्येष्ठ लेखक श्री विचारलं आणि
आता यापुढील वाटचाल ही वाचकांबरोबर. कादंबरीने वाचक, रसिकांच्या मनात जागा मिळवली तर मग सगळंच भरून पावलं म्हणायला हरकत नाही. सृजनगंध गाणे गात जाणारा लेखनाचा हा काळ मात्र खूप आनंद देऊन गेला.
शुभशकुनाची साद यावी
तसे कुणीसे छेडले अलगुजातिल फुंकरीने शब्द होते शुष्क वारे
शब्द बोलू लागले..
अंतरिचे सल बोलले
अर्थगर्भा जाग आली
अंकुर अलगद उमलले.
सृजनघटिका अनुभवावी
आर्त स्वर हे लागले
पाच इंद्रियांविना ते
गंधगात्री झंकारले.
गीता जोशी.
Description
‘या कादंबरीचा नायक मानू- डॉ. मानव हा एक अतिशय हुशार मुलगा, त्याचं डोकं शाबूत आहे आणि ते शेवटपर्यंत राहणार. शीर्षकाला अनुरूप असं हे कथानक आहे.
मानू लहान असताना आजूबाजूच्या परिस्थितीचं भवतालाचं, हळूहळू सगळ्या समाजाचं निरीक्षण करेल. पुढे व्हिजन वाढेल तसा राजकारणावर विचार करेल. कारण त्याचं डोकं शाबूत आहे.
ही कादंबरी मला फार आवडली. त्यात कन्सिस्टन्सी आहे. ही सलगता फार महत्त्वाची. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे त्या मुलाला सुधारण्याचा अव्यवहार्य मार्ग तुम्ही स्वीकारला नाहीत, ते मला जास्त आवडलं. ‘
श्री. अनंत मनोहर (ज्येष्ठ साहित्यिक)
Additional information
Weight | 0.480 kg |
---|---|
Dimensions | 21.5 × 13.5 × 2.2 cm |
Lfcxth –
buy generic tricor 200mg order tricor without prescription tricor sale