Bahava (बहावा) कविता संग्रह

  175.00

   दारीचा बहावा
         बघत रहावा
         सुवर्णवैभव
         वसंतवेल्हाळ
         चैत्राची चाहुल
         वैशाख वणवा
         दोन्हीचे वैभव
         फक्त…..
                       बहावा पाहावा
            डोळ्याचे पारणे
            फिटता फिटेना
            रंगाची ही आस
            मिटता मिटेना
            कोवळ्या उन्हात
            उभा हा नाहत
            कलत्या किरणी
            फक्त….
                           बहावा पाहावा
  पीतांबरी शेला
  भुलवून गेला
  लटकले झेले
  जशी कर्णफुले
  बेहोश होऊन
  गोविंदाचा पावा
  डोळ्यांनी ऐकावा
  फक्त …
                             पाहावा बहावा

  Description

  या आणि अशा अनेक काव्यपंक्ती कवयित्री गीता जोशी यांच्या ‘बहावा’ या कावितासंग्रहात आपल्या मनाचा ठाव घेतात. कवयित्रीला मुळातच निसर्गाचं खूप वेड आहे. निसर्गातील विविध कलाकृती टिपून त्या आपल्या कवितेत चपखलपणे मांडण्याचं कसब आणि प्रतिभा या कवयित्रीमध्ये दिसून येते. सृष्टीच्या, निसर्गाच्या सहवासात राहून गीता जोशी यांच्या काव्याला बहर आला आहे. विविध कवितांच्या रुपाने तो छान मोहरलाही आहे.
  रणरणत्या उन्हात स्वत: बहरून येऊन इतरांना शीतलता आणि प्रसन्नता देणाऱ्या बहाव्या विषयी विशेष प्रेम या कवयीत्रीला आहे, आणि म्हणूनच या संग्रहाला ‘बहावा’ असं सार्थ नाव कवयीत्रीने दिलेलं असावं असं प्रतीत होतं.
  त्यासोबतच निसर्ग, प्रेम, ऋतू, समाज, वास्तव, जीवनानुभव, आठवणी, उपेक्षा, अपमान, दु:ख… असे विविध आशय आणि भाव जपणाऱ्या एकूण १०० कविता या संग्रहात समाविष्ट आहेत.
  कवयित्री गीता जोशी यांचा हा पहिलाच कविता संग्रह आहे. पहिलेपणाच्या काही खुणाही या संग्रहात आपल्याला जाणवतात. तरीही डोळस निरीक्षण करून ते शब्दबद्ध करून काव्याच्या स्वरूपात मांडण्याची किमया या कवयित्रीने साध्य केलेली आहे.
  या पहिल्याच संग्रहाच्या माध्यमातून आश्वासक अशी वाटचाल कवयित्रीने सुरू केली आहे. डोळस वाचन, अभ्यास, मनन, चिंतन आणि सराव यातून ही कविता अधिकाधिक प्रगल्भ होत जाईल असा आशावाद वाटतो.

  Thank you for reading this post, don't forget to subscribe!

  175.00 

  Additional information

  Weight0.145 kg
  Dimensions21 × 14 × 0.4 cm