Aahe Kasa To Anani ? (आहे कसा तो आननी ?)

250.00

आपल्याला ही धावपळ झेपणारी नाही हे त्यांनी मनोमन जाणलं. कारभाऱ्याला बोलावून त्यांनी निघायची तयारी केली. शिवानं गाडी सांगितली. उगवतीला गाडी सोडायची असं ठरलं. पायतळी दिसायला लागल्यावर शशिकाकू बाहेर आल्या. रात्रीच्या गोळ्यांनी असणार, आबांना घाम आला. ताप उतरल्यासारखा वाटत होता. चहा घेऊन तेही बाहेर आले. थोडी हुशारी वाटत होती. गडीमाणसं काकूंच्या सांगण्याप्रमाणे सामानाची, घराची आवराआवर करत होते. आबा थोरल्यापाशी गेले. त्याच्या खोडावरून हात फिरवला. तिथेच उभं राहून त्यांनी एकेका झाडावून नजर फिरवली. डोळ्यांपलीकडच्या चक्षूंनी त्यांनी सर्वांना जवळ घेतलं. मांडवात एका वाशाला लटकवलेला सुक्या मासळीचा डबा काढला. बाळी मांजरी येऊन आबांच्या पायाला डोकं घासू लागली. मासळीचे दोन तुकडे तिच्यासमोर टाकून बाकी सगळा डबा कारभाऱ्या हाती सोपवला. यमनेखालच्या मांडवामध्ये खुर्चीत दहा मिनिटं बसले. कोणीच काही बोलत नव्हतं. कोरलकोटच्या शेंड्यापर्यंत गेलेली नजर, पलीकडे ब्रह्मदेवाच्या डोंगराच्या दिशेनं वळली. बसल्या खुर्चीचा आधार घेत, शिवाचा हात धरून आबा उठले. थोरल्यापाशी जाऊन, यमनेच्या फांदीचा आधार घेत हळू खाली वाकले. यमनेच्या मुळातली मूठभर माती घेऊन उभं राहताना अंगाला थोडा कंप जाणवला. तशाच थरथरत्या हातांनी त्यांनी स्वेटरच्या आत हात घालून माती शर्टाच्या खिशात सोडली. काजळीशी जरा गाडी थांबवा म्हणत ते गाडीच्या दिशेने निघाले.

Description

या कथांमध्ये कोणाकोणाला आपले प्रतिबिंब दिसले तर तो निव्वळ योगायोग समजावा असं तरी कसं म्हणणार? या सगळ्या भेटलेल्या माणसांच्याच कथा. पण ती माणसं कथांतून अवतीर्ण होताना शिल्प उभे राहते, ते संगमरवराची जशी मागणी असते तसे. समोरचे मॉडेल हुबेहूब साकारणे एवढेच साध्य करायचे नसते. तर त्यापलीकडील चैतन्यतत्त्वाचा स्पर्श त्याला हवा असतो. मृगाचे लाल मखमली किडे वरून पडतात असं लहानपणी ऐकलेलं. असं जरी म्हटलं तरी त्यांची निपज इथलीच असते. असायलाच हवी. तरच त्या हाडामासाच्या कथा. नाहीतर त्या एलियनच्या कल्पनाविलासी कथा होतील. अनेक कथांतून येणारे नात्यांचे अनेक पदर…नातं माणसांशी, परिसराशी, प्राणी पक्ष्यांशी, स्वतःशीही! त्या नात्यातली नव्हाळी, निखारे आपले पायरव शब्दांतून उमटवत जातात. कधी दोन-चार व्यक्तिरेखा एका व्यक्तीरेखेत गोळीबंद होतात.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

Additional information

Weight0.215 kg
Dimensions21 × 14 × 0.7 cm