स्वप्नामधील गांवा … (Swapnamadhil Gava)

2,500.00

Description

प्रत्येकाची मनात साठवलेली स्वप्नं असतात तशीच आमचीही होती. पण जरा वेगळी स्वप्नंबंगला, गाडी, पैसा ह्या पेक्षाही जरा वेगळी. स्वप्नामधली गावं – Dream Destinations. त्यातलेच एक स्वप्नातलं गांव म्हणजे svalbard (स्वालबार्ड), पांढऱ्या अस्वलांचा शोधात निघताना वेळ सामाजिक, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि लागणाऱ्या खर्चाचा मेळ, या सगळ्याची सांगड घालतां घालतां स्वप्नातलं गाव दूर जात होतं.
जून २०१८ मध्ये सर्व प्रयत्नपूर्वक जमवून आणलं आणि मोजकं सामान,मुख्य म्हणजे दुर्बिण आणि कॅमेरे घेऊन स्वालबार्डचा रस्ता धरला. प्रवास खूपच लांबचा होता, अगदी जगाच्या टोकापर्यन्तचा. जरा अवघडच वाटत होता. उत्तर ध्रुवाच्या दिशेला शेवटच्या मनुष्यवस्ती पर्यन्त पोहोचायचं होतं. गावाचं नाव होतं Longyerben (लाँगियरबिन). हवामान, प्रवास, इत्यादींची माहिती घेऊन सामान घेतलं, मुख्य म्हणजे बरोबर होतं ते मनोबल आणि तीव्र इच्छा. दोघं एकमेकांना सोबत होतो म्हणून धीर होता. अनोख्या जगांत अगदी वेगळे अनुभव मिळवायला कॅमेरे आणि मनाची कोरी पाटी घेऊन निघालो. ती आणि मादागास्कर आणि दक्षिण आफ्रिका येथील मनातली चित्र तुम्हाला दाखवायची आहे.
त्यासाठी हा पुस्तक प्रपंच..

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

Additional information

Dimensions30 × 27 × 1.5 cm