You are currently viewing वनस्पती प्रकाश व त्याची दिशा ओळखतात

वनस्पती प्रकाश व त्याची दिशा ओळखतात

वनस्पती प्रकाश व त्याची दिशा ओळखतात. आणि त्या दिशेने वाढतात. बाह्य जगात अंधार आहे की प्रकाश हे सांगण्याच्या प्रक्रियेत काही विशिष्ठ गुणसूत्रे किंवा जीन्स (Genes) वनस्पतीत आढळून येतात. नेमकी हीच गुणसूत्रे माणसाच्या DNA त आढळली. वनस्पतींना अंधार किंवा प्रकाशाचे ज्ञान देणारी गुणसूत्रे माणसात कशी ओ कशासाठी ? असा प्रश्न साहजिकच उत्पन्न झाला. बऱ्याच संशोधनानंतर हि गुणसूत्रे प्राणी व वनस्पतीच्या DNA तला समान भाग आहे व ह्या दोन्ही सजीवात त्याचे प्रकाशास प्रतिसाद देण्याच्या प्रक्रियेत ती गुणसूत्रे महत्वाची असतात. प्राण्यांना मात्र जसे चित्र ‘दिसते’ तसे काही वनस्पतींना ‘दिसत’ नाही. परंतु त्या प्रकाशाच्या दिशेने वाढतात. ह्या प्रक्रियेला fototropism फोतोत्रोपिझम म्हणतात. ह्यासाठी मुलभूत व प्राथमिक प्रयोग उत्क्रांती-उपपत्ती-सिद्धांत मांडणाऱ्या चार्ल्स डार्विन ने केले होते. या प्रयोगात त्याला त्याच्या मुलाने – फ्रान्सिस ने मदत केली. डार्विनचा समकालीन ज्युली-अस फॉन साक्स याने असे शोधले कि फोटो-ट्र्रोपिझम प्रक्रीये साठी वनस्पतींना निळ्या प्रराणाची गरज असते. वनस्पतींना पांढऱ्या प्रारणातील बाकी रंग दिसत नसले तरी निळे प्रारण दिसते. बी रुजते ओ मुळे खाली जमिनीत घुसून वाढतात तर कोंब वर आकाशाकडे वाढतो. वाढणारे कोम्बाचे ‘टोक’ हा प्रकाश ‘पाहते’ ओ त्याच्या दिशेने वाढते. वनस्पतींना प्रकाशाची दिशा दाखविण्यात ‘निळ्या’ प्रारणाचा वापर होतो तसा प्रकाश संश्लेषण किंवा फोतोसिंथोसीस Photosyntesis प्रक्रियेसाठी मात्र त्यांना लाल प्रराणाची आवश्यकता असते.

खालील लिंक वरील विदेओ बघा 

https://www.facebook.com/konnbat/videos/1908094989263046/?t=26

Thank you for reading this post, don't forget to subscribe!