You are currently viewing पैश्याचे   गारुड

पैश्याचे गारुड

जीवन व्यतीत करण्यासाठी निर्माण झालेल्या किंवा केलेल्या व्यवस्थेचे अर्थात  “पैसा ” ह्या साधनाचे आपण भारतीयांनी कधी साध्य करण्याचे एकमेव उद्दिष्ट्य बनवून आपल्या संस्कारांना  तिलांजली दिली  हे आपल्यालाच कळले नाही, आणि नुसतीच तिलांजली देऊन आपण थांबत नाही तर पैसा हेच एकमेव तुमच्या प्रगतीचे द्योतक असल्याची भलामण ही करण्यामध्ये कोणत्याही प्रकारची लाज हि आपल्याला वाटत नाही. त्याचेच एक उदाहरण लिंक मध्ये  व्हिडिओ च्या माध्यामातुन आपणा समोर प्रस्तुत करीत आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

ह्या लिंक प्रमाणे जीवनातील प्रत्येक क्षेत्रात हा पैश्याचा हव्यास आणि निलाजरेपणा, कोडगेपणा इतक्या विशाल प्रमाणात पसरला आहे कि, आपल्याला माणूस म्हणून घेण्याची सुद्धा लाज वाटायला हवी. पण दुदैवाने तसे होतांना दिसत नाही. पैश्या चं  हे गारुड जसे सर्व सामान्य माणसावर आहे त्याही पेक्षा जास्त उच्च आर्थिक स्तरावरील लोकांमध्ये काकणभर जास्तच आहे. गरिबांची तर ती अपरीहार्यताच आहे. (त्यांच्या कडे त्यावर उपाय नाही किंबहुदा तो शोधण्याची उर्मी, ताकद आणि शैक्षणिक पात्रता हि अभावानेच आहे) पण मला नेहमीच विषाद वाटत आला तो भारतातील तथाकथित बुद्धिमान  मानल्या जाणाऱ्या वर्गाचा (ज्यांची बुद्धिमत्ता फक्त आणि फक्त त्याच्या शैक्षणिक  गुणवत्तेवर मोजली जाते )खर म्हणजे ह्या वर्गाची विशेष जबाबदारी आहे आपल्या समाजातील इतरांना ह्या बाबतीत जागरूक करण्यामध्ये.नुसती वैचारिक आणि विश्लेषणात्मक गृहीतके मांडून ह्यांची जबाबदारी पूर्ण होत नाही एवढे साधे तंत्र ज्यांना समजू शकत नाही त्यांना बुद्धिमान म्हणण्याचे किंवा मानण्याचे धाडस माझ्यात नाही.वरील विषयाला अनुसरून आपल्या जीवनातील आजारांचे मुल कारणांचा मागोवा घेण्यासाठी आणि अधिक जाणून घेण्यासाठी मी प्रकाशित केलेल्या पुस्तकाची लिंक खाली देत आहे त्या लिंकला भेट देऊन अधिक जाणून घ्या…